Covid-19: तब्बल 2 वर्ष कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा नवा सब-व्हेरिएंट समोर आला असून दिवसेंदिवस या व्हेरिएंटच्या रूग्णांची नोंद होताना दिसतेय. भारतासह जगात JN.1 च्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. चीनमध्ये तर या व्हेरिएंटने हाहाकार माजल्याचं अनेक मिडीया रिपोर्ट्सनुसार समोर आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील 760 नव्या लोकांमध्ये संसर्गाची पुष्टी करण्यात आली आहे. 3 जानेवारीपर्यंत, JN.1 प्रकार देशातील सुमारे 12 राज्यांमध्ये पसरला असून एकूण आता या व्हेरिएंटची लागण झालेल्या लोकांची संख्या 541 वर पोहोचली आहे. देशात कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या 4423 आहे.


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या संसर्गाची जोखीम गेल्या काही काळापासून सातत्याने वाढताना दिसतेय. त्यामुळे ही बाब लक्षात घेता आपण सर्वांना काळजी घेणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला केरळ आणि कर्नाटक या ठिकाणी कोरोनाचे रूग्ण अधिक असल्याचं दिसून येतंय. 


कोरोना टास्क फोर्सने दिले खास निर्देश


राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) च्या म्हणण्यानुसार, कोरोनानुळे दररोज 4-5 लोकांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलंय. मात्र यामध्ये बहुतेक लोकांमध्ये कॉमोरबिडीटी म्हणजेच इतर आजारांची समस्या दिसून येत आहे.


कोरोनाचा धोका लक्षात घेता, कोविड टास्क फोर्सने कोविड पॉझिटीव्ह असलेल्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. कोविड-19 साठी पॉझिटिव्ह चाचणी करणाऱ्या लोकांनी 5 दिवसांसाठी सेल्फ-आयसोलेशन करावं, असा सल्ला देण्यात आला आहे. कुटुंबातील जेष्ठ व्यक्ती आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी मास्कचा वापर करावा. 


लोकांनी उपायांचं गंभीरतेने पालन करावं


टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार, नवीन कोविड सब-व्हेरियंट JN.1 पासून संरक्षण करण्यासाठी, इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी आणि वृद्धांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. याशिवाय घराबाहेर पडताना मास्का वापर केला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी या नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज नसली तरी, खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येकाने कोरोनाच्या योग्य वर्तनाचे पालन करणं सुरू ठेवलं पाहिजे.


महाराष्ट्र यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ सायंसेज की वाइस चान्सलर आणि टास्क फोर्सच्या सदस्य डॉ. माधुरी कानेटकर यांनी मीडियाशी बोलाताना सांगितलं की, सध्याच्या परिस्थितीत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र येणाऱ्या दोन आठवड्यांसाठी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे.