Measles Outbreak in Mumbai: आजाराने थैमान घातले आहे. मुंबईत गेल्या दोन महिन्यात गोवरचे 84 रूग्ण आढळले आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. वाढती रुग्णसंख्या चिंतेंची बाब ठरत आहे.  गोवरची साथ नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महापालिकेच्या(mumbai municipal corporation) आरोग्य विभागातर्फे विशेष मोहिम राबवली जात आहे.


कोरोनानंतर गोवरचा वेगाने फैलाव 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई शहरात गोवरची लक्षणं असलेल्या बालकांची संख्या तब्बल 584 असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत गोवरचा उद्रेक झालाय हे पाहून केंद्रीय आरोग्य यंत्रणेची एक टीम शुक्रवारी मुंबईत दाखल झाली आहे. 
कोरोना काळात अनेक बालकांना लस न मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळेच कोरोनानंतर गोवरचा फैलाव वेगाने होत असल्याचे समजते.


आरोग्य यंत्रणा सतर्क 


गोवर आजाराचे संक्रमण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गोवरचा 2022 मध्ये सर्वाधिक संसर्ग झाला आहे. यावर्षी 109 बालकांना गोवरची लागण झाल्याचं आकडेवारी समोर आली आहे. 
गोवंडी भागात गोवरचे सर्वाधिक रूग्ण आढळत आहेत. गोवरचे सर्वाधिक रूग्ण हे दाटीवाटीने असलेल्या वस्त्यांत तसंच झोपडपट्टी भागात आढळले आहेत.