मुंबई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरचा जुना वर्सोवा पूल आज वाहतूकीसाठी बंद असणार आहे. सकाळी आठ ते दोन याकाळात पूलावरून दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. टेस्टिंगसाठी हा पूल पाच तास बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन या मार्गावर वाहनं आणण्याचं टाळावं असं आवाहन महामार्ग प्राधिकरण आणि वाहतूक पोलिसांनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या जुन्या पुलावरुन एका मार्गिकेतुन लहान तर एका मार्गिकेतुन मोठी वाहनं सोडली जात आहेत. तसे असले तरी पुलाची नियमीत तपासणी करणे गरजेचे बनले आहे. महाड पूल दुर्घटनेनंतर शासकीय यंत्रणा कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाही. शिवाय जुन्या पुलावरुन सातत्याने वाहनांची वर्दळ सुरु असते. नियमीत तपासणी मध्ये पुलाची वजन झेलण्याची क्षमता, तडा गेलेल्या गर्डरची स्थिती दुरुस्ती केलेल्या भागाची तपासणी केली जाणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं.  अशा प्रकारची तपासणी ही दर तीन ते चार महिन्यांनी केली जाणार आहे.