मुंबईसह कोकणात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
मुंबई : मुंबईला सोमवारी जोरदार पावसाने झोडपून काढले. तसेच मुंबई महापालिकेच्या नाकर्तपणामुळे मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. पुढच्या ४८ तासांत मुंबई शहर, उपनगर आणि उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर विदर्भातल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने दिला आहे. विदर्भावरील कमी दाबाचं क्षेत्र वायव्येकडे सरकल्याने राज्यात पाऊस पडणम्याची शक्यता आहे. पुण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्याच आली आहे.
पुढच्या ४८ तासांत मुंबई शहर, उपनगर आणि उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर विदर्भातल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने दिला आहे. मुंबईत जुलैमधील ४४ वर्षांतील सर्वाधिक पाऊस सोमवारी रात्री पडला. २४ तासांत रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली. दिंडोशी परिसरात सर्वाधिक ४८१ मिमी पावसाची नोंद झाली.
सोमवारी मुंबईत चांगलाच पाऊस झाला. त्यानंतर सोमवारी रात्री झालेल्या पावसाने मुंबईची चांगलीच दाणादाण उडवली. सखल भागांमध्ये पाणी साठलं. हिंदमाता, अंधेरी, भारतमाता परिसरात पाणी साठले होते. मुसळधार पावसामुळे मुंबईची पुरती दैना झालीय. शुक्रवार पासून कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली. या वेळी कुर्ला क्रांती नगर हा मिठी नदी शेजारी असलेल्या विभागात भारतीय नौदलाच्या जवानांनी मदतीचा हात नागरिकांना देऊ केला.