मुंबई : मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिवाळीच्या तोंडावर पाऊस धडकणार असल्याने तारांबळ उडण्याची शक्यता आहे. दरम्यान उर्वरित मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम-विदर्भात आभाळी वातावरण दिसून येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकजवळ असलेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील काही भागात मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 


या हवामानाच्या स्थितीचा काही परिणाम सातारा आणि औरंगाबाद जिल्ह्यांत दिसून येईल. परंतु या दोन्ही जिल्ह्यांत सार्वत्रिक आणि चांगल्या पावसाची शक्यता नाही. या दरम्यान उर्वरित मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम-विदर्भात आभाळी वातावरण दिसून येईल. या स्थितीमुळे किमान तापमानात वाढ होईल आणि हवेतील गारवा कमी होईल.