मुंबई : भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं आज निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान लता मंगेशकर यांच्या जाण्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लता दीदी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रतित समदानी म्हणाले, "आम्हाला हे सांगण्यास फार दुःख होतंय. लता मंगशेकर यांचं आज सकाळी 8.12 मिनिटांनी निधन झालं आहे. लता दीदी यांच्या शरीरातील अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचं निधन झालं."


काल ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती. सुरुवातीला त्यांना कोरोना आणि न्यूमोनियामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलं. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलं. 



8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून लता दीदी आयसीयूमध्ये होत्या. प्रकृती पुन्हा एकदा खालावल्यानंतर त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलं होतं. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर 24 तास लता दीदींवर लक्ष ठेवून होते.


शनिवारी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर उपचारांना प्रतिसाद देत होता. मात्र आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी आली. लता मंगेशकर यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे.