मुंबई : मंत्री प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत कागदपत्री पुरावे आहेत. तरीही त्यांना सरकार पाठिशी घालत आहेत, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत त्यांनी स्थगन मांडला.
 
विरोधकांची विधानसभेत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी घोषणाबाजी करत विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला.


- आरोप 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- सरकार मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करत आहे
- मुख्यमंत्री म्हणाले होते चौकशी समिती नेमू
- मात्र अद्याप त्याबाबत कार्यवाही नाही
 


- जयंत पाटील



- कागदपत्री पुरावे आहेत मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत
- नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराविरोधात बोलत असतात
 - ना खाऊंगा न खाने दुंगा, जो खाया है वो निकालूंगा
- मग आम्ही भ्रष्टाचाराची जी प्रकरणी बाहेर काढली आहेत, कागदोपत्री पुरावे दिले आहेत
- मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी निर्णय घ्यावा
- गोल गोल उत्तर देऊ नये


विखे-पाटील


- मुख्यमंत्री म्हणाले होते प्रकाश मेहतांबाबत विरोधी पक्षनेत्यांशी बोलून चौकशी समिती नेमणार
- काय झाले त्याचे, कधी नेमणार चौकशी समिती
- भ्रष्ट मंत्र्यांना सरकार पाठिशी घालतेय
- सभागृहात जाहीर करूनही चौकशी समिती नेमत नाही