मुंबई : शहर आणि परिसरात कोरोनाचा ( coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. मुंबईत (Mumbai) कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 75 दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईतील कोविड (Covid-19) चाचण्यांमध्ये मोठी वाढ करण्याचा आली आहे. दरम्यान, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 88 टक्क्यांवर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचने चिंता व्यक्त होत आहे. मुंबईतील चाचण्याचे प्रमाण वाढवल्यामुळे ही रुग्ण वाढ होत आहे. मुंबईत काल दिवसभरात 46 हजार 869 चाचण्यात झाल्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी घटून 75 दिवसांवर आला आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे 33 हजार 961 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत आहेत.  


दरम्यान उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळी वस्तीत 40 कंटन्मेंट झोन्स जाहीर करण्यात आले आहेत. तर 457 इमारती सील करण्यात आल्यात. तर कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्क्यांवर पोहोचलं आहे.



नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या 681रुग्णांची वाढ एका दिवसात झालीय. तर सध्या 4हजार 159 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दिवसभरात कोरोनानं एकही बळी घेतला नाही ही दिलासादायक बाब आहे. आजवर 1158 जणांचा बळी गेलाय. तर 56 हजार 359 जण कोरोनामुक्त झाले आहेत


तर पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. यापार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाची आढावा बैठक होत आहे. या बैठकीत लोकप्रतिनिधींसह सर्व अधिकारी उपस्थित आहेत. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक होणार की लॉकडाऊन लागणार यावर चर्चा होत आहे.