सोशल डिस्टन्शिंगचे नियम कठोर करण्यात आले
नियमांवरील बंधन कठोर झाली
मुंबई : लॉकडाऊनमध्ये काही नियम शिथिल करण्यात आले याचा गैरफायदा घेत देशात कोरोना व्हायरस रूग्णांच्या संख्येत छपाट्याने वाढ झाली आहे.. गेल्या चोवीस तासात ९९ नवीन रूग्ण दिवसभरात सापडले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही २२०२ पर्यंत पोहोचली आहे. ५५३ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. अशी माहिती दिपक म्हैसकर यांनी दिली आहे.
कोरोना रूग्णांचा बरं होण्याचा आकडा देखील वाढत आहे. देशात आतापर्यंत १५६८ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तसेत १२७२६ लोकं देशभरात ठणठणीत बरे झाले आहेत. तर देशात आतापर्यंत ४६४३३ कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पोहोचली आहे.
दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत देशभरात १०२० रूग्ण बरे झाले. रिकवरी रेट वाढून २७.४०टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. कोरोनाबाधित सोशल डिस्टन्शिंगचे नियम पाळण हा सर्वात मोठी बाब आहे. याबाबत आता काही नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत.
कठोर करण्यात आलेले नियम
आरोग्य सेतूला अधिक महत्व देण्यात आलं आहे.
पीपीई किटचा वापर कशा प्रकारे करावा याची माहिती सर्वाधिक देण्यात यावी
लग्न समारंभात फक्त ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी
अंत्यसंस्काराला फक्त २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी