मुंबई : दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे लॉकडाऊनचं संकट उभं ठाकलंय. या व्हेरियंटमुळे अनेक देशांनी आफ्रिकेवर निर्बंध आणले आहेत. यामुळे दक्षिण आफ्रिकेतील विमानसेवेवर परिणाम झाला असून कडक लॉकडाऊनची भीती सतावतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेतील विमानांवर बंदी घालण्यात आल्याने विमानतळावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर यामुळे अर्थव्यवस्थाही कोलमडण्याची भीती व्यक्त करण्यात आलीय.



जगावर भीतीचं सावट
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉननं पुन्हा एकदा संपूर्ण जगात भीती निर्माण केलीय. यानंतर जगभरातील अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेवर वेगवेगळे निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. 


जगभरातून लावण्यात आलेल्या या निर्बंधांमुळे दक्षिण आफ्रिकेनं नाराजी जाहीर करत दु:ख व्यक्त केलंय. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची ओळख पटवल्याची शिक्षा आम्हाला मिळत असल्याचं दक्षिण आफ्रिकेनं म्हटलं आहे.


भारताचा दक्षिण अफ्रिका दौरा धोक्यात
कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा भितीचं सावट पसरलं  आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौराही धोक्यात येताना दिसत आहे. 


17 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत मॅच खेळवण्यात येणार आहेत. दरम्यान, यासाठी भारताचा अ संघ सीनियर संघापूर्वीच तिथे गेला आहे.