मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. पुढील अधिवेशन हे डिसेंबरला होणार आहे. अर्थात हिवाळी अधिवेशन११ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाचे वादळी पावसाळी अधिवेशन काल रात्री संपले. पुढील हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये ११ डिसेंबर २०१७पासून सुरू होणार आहे. विधान परिषदेतील सभापती रामराजे निंबाळकर यांनी ही घोषणा केली.


पावसाळी अधिवेशन हे सत्ताधारी मंत्र्यांच्या भ्रष्टाचार आरोपांमुळे गाजले. यात प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर विरोधक शांत झालेत.


तसेच शेतकरी कर्जमाफी, भायकळा तुरुंगात महिला कैद्याचा मृत्यू, लातूरमधील मुलीचे अपहरण करुन लग्न मुद्दा,  शेतकरी आत्महत्या प्रश्न आणि मराठा आरक्षणबाबत विरोधकांनी सरकारला धारेवल धरले.