शिवसेनेच्या जन्माची कथा! ऐका संजय राऊत यांच्या तोंडून
सेनेचे पहिले नगरसेवक, आमदार कधी निवडून आले होते? पाहा काय म्हणाले संजय राऊत
मुंबई : भाजपच्या आधी शिवसेनेचा जन्म झाला आहे, असं सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या जन्माचा इतिहासच सांगितला आहे.
१९८४ ला लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढविली होती शिवसेनेच्या नाही, असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेचा जन्म कधी झाला आणि त्यावेळी शिवसेनेचे आमदार, नगरसेवक कोण होते, कधी निवडून आले याचा पाढाच वाचून दाखला.
शिवसेनेचा जन्म कधी?
भारतीय जनता पक्षचा जन्म हा १९८० च्या दशकात झाला. जनता पक्षाचं पतन झाल्यावर. आणि शिवसेनेचा जन्म हा १९६९ साली झाला. शिवसेनेचे पहिले महापौर हे या मुंबई शहरात डॉक्टर हेमचंद्र गुप्ते हे कधी झाले, आमचे किती नगरसेवक निवडून आले. यासंदर्भातलं एखादं अभ्यास शिबिर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये ठेऊ, आणि कोणाला त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर येऊ द्या, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
शिवसेनेचे पहिले आमदार
शिवसेनेचे पहिले आमदारही त्याचकाळात निवडून आले वामनराव महाडिक शिवसेनेच्या स्थापनेनंतर. गिरगावातून प्रमोद नवलकर निवडून आले होते, आमचे आमदार म्हणून. माझगावातून छगन भुजबळ निवडून आले होते, आमचे वाघ मुंबईतून निवडून आले आहेत, भारतीय जनता पक्षाच्या जन्माआधी.
फडणवीस यांचा मुंबईशी संबंध नाही
देवेंद्र फडणवीस यांचा तेव्हा मुंबईशी फारसा संबंध नसेल, महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नसेल, या सर्व गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या जन्माच्या आधीच्या आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.