मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुसतीच एक विशेष मुलाखत दिली आहे. 'एक शरद, सगळे गारद…!' ही मुलाखत  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली. या मुलाखती दरम्यान शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांवर आपले परखड मत व्यक्त केले. 'कोरोना काळात जगात अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात आपल्या पाठपुस्तकात कोरोनासंबंधित एक धडा असावा. त्यामध्ये आपण गेल्या दोन महिन्यांमध्ये काय अनुभवलं. त्यावर कोणत्या प्रकारची काळजी आणि खबरदारी घ्यायला हवी याची नोंद असायला हवी.' असं त्यांनी सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाय, कोरोना कायमचा नष्ट होणार विषाणू नाही तो पुन्हा भविष्यात उद्भवू शकतो असं मत देखील शरद पवारांनी यावेळी व्यक्त केलं. 'ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तो नॉरमलवरती येईल. पण याचा अर्थ तो कायमचा संपला असं नाही, तो पुन्हा येवू शकतो.' असं देखील ते म्हणाले. 


जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा ट्रेंड खाली जाईल असं देखील ते म्हणाले. 'यापुढे कोरोनासोबत जगण्याची प्रत्येक नागरिकाने तयारी करायला हवी. कोरोना आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग होत असल्याची भूमिका तज्ज्ञांनी स्पष्ट केली आहे. ही भूमिका गृहीत धरून पुढील वाटचाल करण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं.