मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यात कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. आज मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेतली. बैठकीत महत्त्वाचे  निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. टोपे म्हणाले, 'कोरोनाबाधित रुग्णांचा आजचा आकडा 66 हजारच्यावर आहे. कंपनी CSRच्या माध्यमातून कोरोनाबाबत मदत करू शकते, असा निर्णय घेण्यात आला असल्याचं देखील ते म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'प्रत्येक रुग्णालयाने ऑक्सिजन ऑडिट केलं पाहिजे अशा सूचना केल्या आहेत. सव्वाशेच्यावर हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे प्लांट पुढील एक महिन्यात विविध जिल्ह्यात बसतील असा निर्णय झाला आहे.' यावेळी राजेश टोपे यांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता देखील वर्तवली. 


'जुलै, ऑगस्टमध्ये तिसरी लाट येईल असा अंदाज आहे, तेव्हा जिल्हयात ऑक्सिजन उपलब्ध होत नाही हे ऐकून घेतले जाणार नाही, तेव्हा तशी तयारी करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना दिले आहेत.'


दरम्यान,  राज्यात कोरोनाचा वाढता कहर पाहता 14 एप्रिलपासून सरकारने करोनाबाबतचे निर्बंध लागू केले होते. राज्य सरकारने लावलेले हे कठोर निर्बंध १ मे रोजी सकाळी ७ वाजता संपणार होते. त्यामुळे पुढे लॉकडाऊन असेल की नाही अशी चर्चा सुरू झाली होती. पण आता राज्यात लागू असलेले निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.