VIRAL VIDEO: अतिउत्साह की मजबुरी? धावत्या लोकलमधून पडला तरुण
मुंबईतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लोकल ट्रेनमधून प्रवास करताना एक युवक पडला आहे. युवक पडताच लोकलमधील प्रवाशांनी आरडाओरड सुरु केली आहे.
Mumbai Train Accident Viral Video: Mumbai Train Accident Viral Video: मुंबई लोकल ट्रेनचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. लाखो लोक मुंबईच्या लोकलमधून प्रवास करत असतात. इच्छा नसतानाही लोकांना गर्दीमधून प्रवास करावा लागतो. सोशल मीडियावर लोकमधील गर्दीचे देखील व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र, आता सध्या एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक युवक चालत्या ट्रेनमधून पडला आहे. युवक पडताच लोकमधील लोकांनी आरडाओरडा सुरु केला.
मुंबई लोकलचे वेगवेगळे व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. प्रचंड गर्दीमुळे काही जण प्रवास करताना दाराला लटकलेले असतात. सध्या या व्हिडीओमध्ये देखील असच दिसत आहे. एक तरुण गर्दीमुळे लोकलच्या दरवाज्याला लटकला होता. त्याच वेळी त्याचा हात सुटतो आणि तो खाली पडतो.
विवेक अग्निहोत्रीकडून व्हिडीओ शेअर
चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला असून केंद्रासह राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, एक माणूस पुन्हा मुंबई लोकल ट्रेनमधून पडला आहे. मुंबई लोकल ट्रेन अपघातात दररोज 7 ते 10 लोकांचा मृत्यू होतो. होय, दररोज याकडे दुर्लक्ष करून आपण 'विश्वगुरू' होऊ शकतो का? महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारने नागरिकांना मरायला सोडले आहे.
A man falls off the Mumbai local train AGAIN.
SEVEN TO TEN people DIE every day in Mumbai local train accidents. Yes, every day. Can we become a ‘Vishvaguru’ by being blind to this?
Every successive government in Maharashtra has left the citizens to die. pic.twitter.com/ulpwsIDADt
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri)
यापूर्वी देखील अग्निहोत्री यांनी रेल्वे सेवा विस्कळीत असताना ऑफिसला जाण्यासाठी रुळांवरून चालत असलेल्या लोकांचा व्हिडिओ शेअर केला होता.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय?
मुंबई लोकलमधून युवक पडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. पण हा व्हिडीओ 2022 चा असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.