मुंबई : गेल्या काहीदिवसांपासून कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. आता या व्हायरसचा संसर्ग रोकण्यासाठी सर्वच स्तरातून अनेक शकली लढवण्यात येत आहेत. पश्चिम रेलेल्वेने देखील  करोनासंबंधी जागरुकता पसरवण्यासाठी सिनेमाचं टायटल ट्रॅक 'कुछ कुछ होता है'चे लिरिक्स बदलले. 'तुम पास आए, यूं मुस्कुराए, हाथ मिलाए तो वायरस फैलाए.' अशा आशयाचं ट्विट पश्चिम रेलेल्वेकडून करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक फोटो पोस्ट करत पश्चिम रेल्वेने करोना विषयी जागरुकता पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाण ट्विटच्या माध्यमातून रेल्वेने सतत हात स्वच्छ धुवण्याचा सल्ला दिला आहे. हात स्वच्छ ठेवा आणि साबण किंवा एल्कोहोलयुक्त हँड सॅनीटायझरचा वापर करा. नाक तोंड आणि डोळ्यांना हात लावू नका. असं ट्विट पश्चिम रेल्वेने केले आहे. 



मुंबई रेल्वे आणि उपनगरीय  लोकलने दररोज ७५ लाखांहून अधिक लोक रेल्वेने प्रवास करत आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने रेल्वे फिनाईलने साफ करण्याचा निर्णय घेतला आहे. 


रेल्वे लोकलचे डबे रात्री साफ करण्यात येणार आहेत. याआधी लोकल केवळ साफ केल्या जायच्या. तरे १५ दिवसांनी पाण्याने धुतल्या जायच्या. आता दररोज रात्री लोकल गाड्या फिनाईल पाण्याने फुसून साफ करण्यात येणार आहेत.


भारतात कोरोनामुळे १० रूग्ण एकदम ठणठणीत झाल्याची माहिती समोर येत आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही आता ८४ पर्यंत पोहोचली आहे. तर राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २० पर्यंत पोहोचली आहे.