मुंबई :  आजच्या या धकाधकीच्या आणि  माणुसकी हरवलेल्या जगात सोशल मीडिया आपल्या मनातील भावना मांडण्याचं उत्तम मार्ग आहे.  सोशल मीडियावर रोजच अनेक फोटो, स्टोरी व्हायरल होत असतात. काही गोष्टी विचांरांमध्ये प्राकाश टाकतात, तर काही जगातील सत्य-असत्यामधील साम्य ओळखायला शिकवतात. पण सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये महिला बाथरूममधील कमोडवर बसली आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर संस्कृतीरक्षक विरुद्ध उदारमतवादी असा वाद रंगला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या फोटोमधील महिलेचं नाव गीता यथार्थ असं आहे. त्या भारतीय माहिती आणि प्रसारण खात्यात कार्यरत आहेत. आजवर त्यांनी सातत्यानं हिंदी माध्यमांमध्ये विविध सामाजिक-सांस्कृतिक मुद्द्यांवर लिहून लोकांचं लक्ष वेधलं आहे. त्या एकट्या त्यांच्या मुलाचा सांभाळ करतात.  त्यामुळे त्यांना बाळाची खास काळजी घ्यावी लागते.  लहान मुलांचा सांभाळ करणं म्हणजे अत्यंत काळजीचं काम आहे. 



गीता यांच्याकडे बाळाचं  पालकत्व असल्यामुळे त्यांना बाथरूमला जाताना देखील मुलाला एकटं सोडून जाता येत नाही. त्यामुळे आपण बाथरुमला जाताना दरवाजा बंद करत नाही, असे गीता यथार्थ यांनी सोशल मीडियावर सांगितले होते. गीता यांनी शेअर केलेल्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही जण त्यांना ट्रोल करत आहेत. अत्यंत खालच्या  भाषेत नेटकरी त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. 


तर गीता यांच्या फोटोनंतर सोशल मीडिया #Bathroompic या हॅशटॅगचा वापर करून महिला त्यांचे फोटो शेअर करत आहेत. याआधी परदेशातील अनेक महिलांनी बाथरूममधील फोटो शेअर करत आपली व्यथा शेअर केली आहे.