मुंबई : पावसासाठी योग्य वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मान्सून वेळेवर येईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मान्सूनसाठी अनुकुल वातावरण तयार झाले आहे. पश्चिम बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे  पुढील ३ ते ४ दिवसांत दक्षिण केरळात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.


केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, पूर्व विदर्भात आणखी ३ दिवस तरी पारा चढलेललाच राहणार आहे, असे कुलाबा वेधशाळेने स्पष्ट केले आहे.