Rahul Gandhi Video : काँग्रेस नेते  राहुल गांधींच्या एका व्हिडीओवरुन भाजप आक्रमक झाली आहे. राहुल यांनी व्हिडीओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, काँग्रेसनं महाराष्ट्राची माफी मागावी असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तर बावनकुळेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलंय. व्हिडीओचा चुकीचा अर्थ काढला गेला, भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले तेव्हा गप्प का बसला होतात असा


पटलावर पटोलेंनी केला आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे राहुल गांधींच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये?
राहुल गांधींच्या एका रॅलीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत राहुल गांधी पदयात्रा करत जनतेशी संवाद साधत आहेत. या व्हिडिओ मागे जे म्युजीक लावण्यात आले आहे त्यावरुन भाजपने  राहुल यांनी व्हिडीओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. 


राहूल गांधींनी केला ट्रकने प्रवास


काँग्रेस नेते राहुल गांधींचा साधेपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे. राहूल गांधींनी दिल्लीहून चंदीगडपर्यंतचा प्रवास ट्रकमधून केला. त्यांच्या हा ट्रकप्रवासाचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रवासादरम्यान राहुल गांधींनी ट्रकचालकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसंच प्रवासातल्या अडचणींवरही चर्चा केली.  याआधी कर्नाटकमध्येही राहुल गांधींच्या साधेपणाचे व्हिडिओ समोर आले होते. कधी स्कूटरवरुन प्रवास तर सार्वजनिक बस प्रवास करत त्यांनी सामान्यांची मनं जिंकून घेतली होती.


महाविकासआघाडीत जागावाटपाचा  फॉर्म्युला ठरेणा


मविआत जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नसल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी स्पष्ट केलंय. तर, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांनी ज्या 25 जागा जिंकलेल्या नाहीत त्या जागांवर सर्वात आधी चर्चा व्हावी अशी भूमिका अजित पवारांनी मांडली. तर मेरिटच्या आधारावर जागावाटप व्हावं अशी भूमिका काँग्रेसच्या बैठकीनंतर नाना पटोलेंनी मांडली. 


जागावाटपावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी


लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे.जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे नेते रोज नवीनवी वक्तव्यं करत आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीतले मतभेद वाढण्याची शक्यता आहे.