मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्यात सर्वत्र गंभीर परिस्थिती आहे. याप्रकरणी अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान राणेंच्या वक्तव्याचा निषेध करत शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. राणेंनी फक्त मुख्यमंत्र्यांचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे. असं वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयंत पाटील म्हणाले, 'राणेंनी फक्त मुख्यमंत्र्यांचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे. काही लोकांचा स्तर खाली गेला आहे. अशा लोकांना महत्व देण्याची गरज नाही. भाजपला उद्धव ठाकरेंबद्दल द्वेष असेल, पण अशी भाषा वापरणं योग्य नाही.  उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयमीपणे वागले आहेत. गृहविभागाकडून सध्याच्या स्थितीबाबत माहिती घेतली जाईल, असं देखील पाटील म्हणाले. 


पाटील पुढे म्हणाले, 'आक्रमक झालेत ते केवळ शिवसैनिक नाहीत. मुख्यमंत्र्यांचा अपमान झाल्यानं जनता आक्रमक झाली. पोलिसांकडून त्यांना कंट्रोल केलं जाईल मुद्दे संपले की लोक अशी भूमिका घेतात. अशा प्रकारची स्टेटमेंट आजवर राजकारणात केली जात नव्हती. भाजपनं कशा लोकांना प्रवेश दिलाय याचा भाजपनंच विचार करावा. 


नारायण राणे यांचं हे वक्तव्य नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य समजलं पाहिजे, कारण नरेंद्र मोदी यांनीच त्यांना मंत्री केलंय. राज्यातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस याचं समर्थन करतायत का? ते त्यांनी स्पष्ट करावं असं जयंत पाटील म्हणाले.