मुंबई: गुरुवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ३६ जणं या घटनेत जखमी झाले. याआधी एलफिंस्टन आणि अंधेरी या ठिकाणी पादचारी पूल कोसळल्यामुळे अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. या घटनेला महापालिका जबाबदार असल्याची माहिती मिळते आहे. स्थानिकांनी आणि त्या पूलावरुन ये-जा करणाऱ्या लोकांनी महापालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कूटूबीयांना अर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली. 
 
मुंबई शहरातील पदचारी पुल कोसळल्याची ही तिसरी घटना आहे. याआधी २९ सप्टेंबर २०१७ रोजी एलफिंस्टन रेल्वे स्थानकावरील पूलामुंळे २३ जणांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर ३९ जणं जखमी झाले होते. त्यानंतर अंधेरी येथे ३ जुलै २०१८ पादचारी कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असून ५ जणं जखमी झाले होते. सीसीएमटी जवळील पूल कोसळल्यानंतर स्थानिकांनी संतप्त अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. घटनेच्या वेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, नागरिकांना मेट्रोसारखी नवीन सुविधांची काहीच गरज नाही, ज्या मुलभूत सुविधा आहेत. त्याकडेच प्रशासनाने किंवा महापालिकेने लक्ष केंद्रित करावे. नागरीकांचा जीव इतका स्वस्त आहे का? असा प्रश्नही त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित केला. 


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, मृतांच्या परिवाराला ५ लाख रुपये अर्थिक मदत म्हणून देण्यात येणार. तसेच जखमींना ५० हजार देण्याचे घोषीत केले. मात्र, या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.