...म्हणून हेमामालिनीने नाकारले मंत्रिपद !
बॉलिवूडची ड्रीमगर्ल आणि खासदार हेमामालिनी या सध्या इंडो-जॉर्जियन फ्युजन नृत्य `सिनर्जी`चं भारतात आयोजन करण्याच्या कामात व्यस्त आहेत. याच कार्यक्रमानिमित्त घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांना खासदारकीची निवडणूक जिंकूनही मंत्रीपद का घेतलं नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी मंत्रीपदात रस नसल्याचं सांगितलं.
मुंबई : बॉलिवूडची ड्रीमगर्ल आणि खासदार हेमामालिनी या सध्या इंडो-जॉर्जियन फ्युजन नृत्य 'सिनर्जी'चं भारतात आयोजन करण्याच्या कामात व्यस्त आहेत. याच कार्यक्रमानिमित्त घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांना खासदारकीची निवडणूक जिंकूनही मंत्रीपद का घेतलं नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी मंत्रीपदात रस नसल्याचं सांगितलं.
हेमामालिनी म्हणाल्या की, 'मी जशी आहे त्यात खूश आहे. मला मंत्रीपदाची अपेक्षाही नाही आणि आवडही नाही. मला कलेची जास्त आवडतं. मी जर कोणत्या खात्याची जबाबदारी घेतली तर मला मुंबई, बॉलिवूड, कला या सगळ्यापासून दूर जावं लागेल.'
मथुरा लोकसभा क्षेत्रातून त्या निवडून आल्या आहेत. तिथे त्यांची कामं सुरू आहेत. त्या म्हणाल्या, 'निवडणूक जिंकल्याने खासदार तर मी आहेच. खासदार म्हणून माझ्या मतदारक्षेत्रात हळूहळू माझं काम करत आहे. मथुरेत मी खूप बदल घडवला आहे.'
सीनर्जीबद्दल त्या बोलल्या, 'मी जॉर्जियाला गेले होते, तेव्हा हे नृत्य पाहून मी भारावून गेले. या कलाकारांना भारतात त्यांची कला सादर करायला बोलवायला हवे, अशी माझी इच्छा होती आणि आता ती आता खरी होत आहे. मुंबईत ८ सप्टेंबर, दिल्लीत १० सप्टेंबर, कोलकात्यात १५ सप्टेंबर तर चेन्नईत १७ सप्टेंबरला हा कार्यक्रम होणार आहे. कला, राजकारण, उद्योग क्षेत्रातल्या अनेक नामवंतांना या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं आहे.'