मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ( Daud Ibrahim ) याचा भाचा अलीशाह पारकर ( Alishah Parkar ) याचा ईडीने काही दिवसांपूर्वी मनी लाॅड्रींग प्रकरणात जबाब नोंदवला होता. त्यावेळी त्याने ईडीला माहिती दिली. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाऊदची बहीण हसीना पारकर ( Hasina Parkar ) हिचा मुलगा अलीशाह पारकर ( Alishah Parkar ) हा कराचीत राहतो. ईडीने काही दिवसांपूर्वीच अलीशाह याचा जबाब नोंदवला. त्यावेळी त्याने ईद तसेच दिवाळीच्या सणांना मामा दाऊद इब्राहिम ( Daud Ibrahim ), त्याची पत्नी महजबिन ( Mahjabin ) हे माझी पत्नी आयशा आणि माझ्या बहिणीशी संपर्क करतात, असे त्याने सांगितले.


मामा दाऊद भारतातून पळून गेल्यानंतर त्याची सर्व मालमत्ता आणि व्यवसाय आई हसीना पारकर सांभाळायची. यातील अनेक मालमत्ता या आजीच्या नावावर होत्या. सलीम पटेल ( Salim Patel ), खालीद ( Khalid ) आणि शमिन ( Shamin ) हे हसीना पारकरसाठी काम करायचे.


त्यावेळी आई हसीना पारकर आणि सलीम पटेल यांनी कुर्ल्यातील गोवावाला बिल्डिंगचा ताबा मिळवला होता. तिथे ऑफिस सुरू करण्यात आलं आणि कंपाऊंडच्या काही भागावर ताबा मिळवला होता. गोवावाला कंपाऊंडचा काही भाग आई हसीना पारकर हिने नवाब मलिक यांना विकल्याचा खुलासा अलीशाह याने केला आहे. 


या जागेचा नेमका काय वाद होता माहित नाही. मात्र, आई हसीना पारकर हिने यातील हा भाग नवाब मलिक यांना विकल्याचा दावा अलीशाह पारकरने ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. यामुळे मलिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.