सलमान खानला मिळालेल्या धमकीची उकल, सर्व रहस्य पोलिसांसमोर उघड
सलमान खान याला मिळालेल्या धमकीबाबत मोठी माहिती आली पुढे.
Salman Khan Threat Letter Case : बॉलिवूड स्टार सलमान खानच्या घराबाहेर धमकीचं पत्र (Threat to Salman Khan) मिळाल्याचं प्रकरण मिटलं आहे. धमकीचे पत्र मिळाल्याप्रकरणी सौरभ महाकाल नावाच्या व्यक्तीचं नाव पुढे येत असून, त्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत या पत्राचे संपूर्ण सत्य समोर आले आहे. बुधवारी मोठी कारवाई करत पुणे ग्रामीण पोलिसांनी फरार सौरभ महाकाल याला मोक्का अंतर्गत अटक केली.
या आरोपीचे तार पंजाबी गायक सिद्धू मुसावाला यांच्या हत्येशी संबंधित आहेत. पोलिसही त्यामागे होते. आता त्याची चौकशी सुरू आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येत त्याचा काही हात होता की नाही हे सध्या तरी कळू शकलेले नाही. पण आता अनेक रहस्यांचा उलगडा होऊ शकतो.
दुसरीकडे, सलीम खान आणि अभिनेता सलमान खान यांना धमकीची पत्रे मिळाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा बुधवारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्यासाठी दिल्लीत आली. मुंबई पोलिसांनी सलीम खान आणि सलमान खानचे जबाब नोंदवले असून सलमान खानच्या वांद्रे येथील घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी सलमानच्या दोन अंगरक्षकांचे जबाबही नोंदवले आहेत.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची 29 मे रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर सलमान खानला धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती.