मुंबई : Threats to Aditya Thackeray : महाविकास आघाडी सरकारमधील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी एकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आदित्य यांना मिळालेल्या धमकीचे  पडसाद विधानसभेत उमटलेत. सत्ताधारी आणि विरोधकांनी धमकीचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. या धकमीप्रकरणी एसआयटीमार्फत तपास करण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली होती. या धमकी प्रकरणी विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. ही एका मंत्र्याला धमकी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला धमकी आहे, असे विरोधकांनी म्हटले आहे. एकाद्या मंत्र्याला किंवा विधानसभा सदस्याला धमकी देणाऱ्याला जबर बसली पाहिजे. याची गंभीर चौकशीची मागणी सत्ताधारी आणि विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात केली.



दरम्यान, धमकी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करणार आहेत, अशी घोषणा विधानसभेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना धमकी देणाऱ्या आरोपीला बंगळुरुमधून अटक करण्यात आली आहे. आरोपी जयसिंग बजरंगसिंग रजपूतला 3 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.