मुंबई : Air India Colony Controversy : कलिन्यातल्या एअर इंडिया कॉलनीवरुन आता वाद पेटणार आहे. एअर इंडिया कॉलनी आता अदानी समूहाच्या ( Adani Group) ताब्यात गेली आहे. अदानी समूहाच्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड कंपनीकडे (Mumbai International Airport Limited Company) ही मोक्याची जमीन नियमबाह्य पद्धतीने सोपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, एअर इंडिया कॉलनीतील घरे खाली करण्यासाठी धमक्या येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या वादात शिवसेनेची ( Shiv Sena) उडी घेतली आहे. त्यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता अदानी समूहाने इथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरे रिकामी करण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या रकमा थांबवल्या गेल्या आहेत. कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड रोखण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. 


शिवसेनेने आता या वादात उडी घेतली आहे. वसाहतीतल्या हजारो नागरिकांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. केंद्रातल्या भाजप सरकारने देश विकायला काढल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. विमानतळांच्या जागा धनदांडग्यांच्या घशात घातल्याचा आरोप करण्यात येत आहे.