मुंबई : महापालिका रुग्णालयांतील शस्त्रक्रिया विभागात 'थ्री डोम ऑपरेशन लाईट' खरेदीसाठी कंत्राटदाराने बनावट कागदपत्रे सादर केल्याचे प्रकरण भाजपने स्थायी समितीत उघडकीस आणलेआहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशासनाने याची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी केलीये. पालिका रुग्णालयांतील शस्त्रक्रिया विभागात वापरण्यात येणाऱ्या 'थ्री डोम ऑपरेशन लाईट' खरेदीसाठी आवश्यक असलेले उत्पादन प्रमाणित करण्याचे प्रमाणपत्र (सीई) सादर करण्याऐवजी संबंधित कंत्राटदाराने भलताच तांत्रिक अहवाल सादर केला. 


यात बनावट कागदपत्रे सादर करून हे कंत्राट सहजरित्या मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. बनावट कागदपत्रे सादर करूनही याकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही कानाडोळा केला. त्यामुळे असे कंत्राट कोणत्या अधिका-यांनी दिले,  शिवाय बनावट कागदपत्रे सादर करून कंत्राट मिळवणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी प्रभाकर शिंदे यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे केली.