मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोमवारी मान्सूनपूर्व तयारी करण्यासाठी मुंबई शहरातील तीन प्रमुख कोविड -19 केअर सेंटरमध्ये नवीन रूग्णांची भरती १ जूनपर्यंत थांबविली आहे. बीकेसीच्या कोविड -19 सेंटरचे डीन डॉ. राजेश डेरे म्हणाले की, या सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या बहुतांश रूग्णांना तौत्के चक्रीवादळामुळे इतर रुग्णालयात पाठवण्यात आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते म्हणाले की, वांद्रे-कुर्ला संकुल, दहिसर आणि मुलुंड या तीन सेंटरमध्ये नवीन रूग्णांची भरती १ जूनपर्यंत थांबविण्यात आली आहे. हे कोविड सेंटर गेल्यावर्षी एक तात्पुरती रचना म्हणून बांधले गेले होते. त्यामुळे आता पावसाळी हंगाम आणि इतर महत्वाची कामे हाताळण्याच्या दृष्टीने या सेंटरच्या दुरुस्तीचे काम करावे लागेल.


नवीन जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्याची योजना


मुंबईतील भायखळा, वरळी, बीकेसी, गोरेगाव, दहिसर आणि मुलुंडमध्ये कोविड 19 ची सहा केंद्रे सध्या कार्यरत आहेत. महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, साथीच्या तिसर्‍या लाटीचा सामना करण्यासाठी बीएमसीने तयारी सुरू केली आहे, त्या दृष्टीने शहरात काही नवीन कोविड -19 सेंटर तयार करण्याची योजना सुरु आहे.


आकडेवारीनुसार रविवारी मुंबईत कोविड -19 चे 1 हजार 431 नवीन केसेस सापडले आहे, तर 49 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 6 लाख 97 हजार 810 पर्यंत झाली आहे आणि मृतांची संख्या 14 हजार 623 वर पोहोचली आहे.


महाराष्ट्रात कोरोनामुळे 594 लोकांचा मृत्यू


रविवारी महाराष्ट्रात कोरोना संक्रमित 26 हजार 672 नवीन केसेस समोर आल्यानंतर संक्रमित लोकांची संख्या 55 लाख 79 हजार 897 वर पोचली आहे, तर 594 रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.


महाराष्ट्रात संसर्गातून मुक्त झालेल्या लोकांची संख्या आज 51 लाख 40 हजार 272 वर गेली आहे. तर राज्यातील सक्रीय रूग्णांची संख्या 3 लाख 48 हजार 395 आहे.