Dombivali News: सध्या डोबिंवलीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. क्षुल्लक वादातून चक्क तीन तरूणांनी एका व्यक्तीचं गुप्तांग(Private Part) कापलं आहे. सध्या या प्रकारानं डोबिंवली (Dombivali News) हादरलं आहे. किरकोळ वादातून आपल्या भावावरचं धारदार शस्त्रानं (Crime News Dombivali) वार करण्याचं आयोजन त्यांनी केलं आहे. या वादात लिंग कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे डोबिंवली शहरात एकच खळबळ माजली आहे. जखमी तरूणाला तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर सध्या जेजे रूग्णालयात (JJ Hospital) उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे तिघंही एकाच घरातले आणि एकाच कंपनीत काम करत असल्यानं त्यांच्यात किरकोळ वाद होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार, संजयकुमरा मुन्सीराम राम यांच्यासह सुरेंद्र रमेश राम, आश्रय राम आणि सोनुकुमार राम अशी आरोपींची नावं आहेत. हे चौघंही तरूण गोळवली येथील एमआयडीसीमध्ये एकत्र काम करत होते. संध्याकाळी आपापली कामं संपल्यानंतर रात्री एकत्र जेवण आणि दारू (Beer) प्यायचा प्लॅन करत होते. त्यांनी तसा प्लॅनही केला. चिअर्स करत मद्यपानाला त्या तिघांनी सुरूवातही केली होती. परंतु काही दिवसांपुर्वी संजयकुमार मुन्सीराम यांच्यासह या तिघांचा वाद झाल्यानं सुरेंद्र रमेश राम, आश्रय राम आणि सोनुकुमार राम यांनी त्याला मध्यरात्री ठार मारण्याचा प्लॅन केला. त्यासाठी सोनुकुमारनं धारदार शस्त्र आणि लोखंडी रॉडची व्यवस्था केली होती असं कळते.


सध्या भावाभावांमध्येच अनेक खटके उडताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या असे काही धक्कादायक प्रकार घडताना दिसत आहेत. या डोबिंवलीतील प्रकारानं पुन्हा एकदा एकच खळबळ माजली आहे. 


कसा घडला नेमका प्रकार?


हे चौघंही जणं जेवून झाल्यानंतर दारू प्यायला बसेल तेवढ्यात या आरोपींनी संजयकुमारला घट्ट पकडलं. सोनुकुमारनं धारदार शस्त्रानं त्याचं गुप्तांगच छाटलं. याशिवाय संजयकुमारच्या पाठीवर मानेवर लोखंडी रॉडनं त्याच्यावर वारही केले. असा घृणास्पद प्रकार घडला आहे. यावेळी खूप रक्तस्राव झाल्यानं आरोपींनी पीडिताला घाबरून रूग्णालयात नेले. तेव्हा हा सगळी खरा प्रकार समोर आला. घटनास्थळी सापडलेल्या हत्यारांनी पोलिसांनी पडताळणी केली आणि आरोपींवर गुन्हा दाखल केला. 


हेही वाचा - 'आजोबा मला...' चौथीतल्या मुलीने सांगितलेला किस्सा ऐकून शिक्षिका हादरली, थेट पोलीस स्टेशन गाठलं


यावेळी जखमीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर लवकरात लवकर या आरोपींना कडक शिक्षा (Police) होण्याची मागणी होते आहे. त्याचबरोबर अद्यापही यांच्या कुटुंबियांची माहिती नाही. त्यामुळे अजूनही त्यांच्यात नक्की कशांमुळे वाद झाला आहे हेही उघड होईल की त्यांनी इतका मोठा गुन्हा करण्याची हिम्मत दर्शवली.