मुंबई : युके (UK New Corona) पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) कोरोनाही मुंबईच्या वेशीवर दाखल झाला आहे. खारघरमधील टाटा मेमोरिअलमध्ये (New Corona found in Kharghar Tata Memorial)दक्षिण आफ्रिकन कोरोनाचे ३ रूग्ण सापडले आहेत. ब्रिटनमधील स्ट्रेनपेक्षाही दक्षिण आफ्रिकेतील E484K म्युटेशन खतरनाक असल्याचं समजलं जात आहे. तीन रूग्णांपैकी एक रूग्ण ठाण्यातील एक रायगडमधील आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरात तयार होणाऱ्या तिन्ही प्रकारच्या अँटिबॉडीज या व्हायरसविरोधात लढण्यास प्रभावी नाहीत. देशात यूकेतील नवा कोरोनाची रुग्णांची भारतातही संख्या वाढू लागली. आता त्यात दक्षिण आफ्रिकेतील नवा कोरोनाही भर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाचे मुंबईत तीन रुग्ण सापडले आहेत. अँटिबॉडी प्रभावी नाहीत त्यामुळे धोका नसल्याचं टाटा मेमोरिअलमधल्या तज्ज्ञांचं मत आहे. 


कोरोना लसीबाबत भारत जगाचं आशास्थान असल्याचं म्हटलं जात आहे. १६ जानेवारीपासून भारतात कोरोना लस देण्यात येणार आहे. अनेक देशांचे भारतीय लस मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. भारतीय लस नेपाळ, श्रीलंकेसह मध्य आशियातील देशांना हवी आहे. म्यानमार आणि दक्षिण आफ्रिका देशांशी लस घेण्यासाठी आधीच करार झाला आहे. 


कोरोना लसीबाबत भारत देश हा जगाचं आशास्थान बनलंय.. अनेक देशांचे भारतीय लस मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत .नेपाळ, श्रीलंका हे शेजारी देश तसंच कझाकस्तान हे कोरोना लस मिळविण्यासाठी भारताच्या संपर्कात आहेत. तर कोरोना लस घेण्यासाठी म्यानमार आणि दक्षिण आफ्रिका देशांनी याआधीच भारताशी करार केला आहे.



कोरोना साथीवर कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन लस विकसित झाल्यानंतर आता हे देश भारताकडे आशेने पाहू लागलेत. मध्य आशियातील देशांना कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्याची योजना भारताने आखली आहे. त्यामध्ये बांगलादेश, भूतान, मालदीव, व्हिएतनाम, कंबोडिया, किरगिझस्तान, उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे.