मुंबई : अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने दोन अल्पवयीन मुलांनी चक्क घर सोडून दिलेय. ही तिन्ही मुले आठदिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांनी आपल्या आजीला एक चिठ्ठी लिहिलेय. त्यात त्यांनी अभ्यासचा ताण होत असल्याचे म्हटलेय.


आठ दिवसांपासून बेपत्ता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोरिवली पूर्वेकडील शांतीनगर येथील हे दोघे अल्पवयीन विद्यार्थी आहेत. ते दोघे भाऊ आहेत. तसेच एक चुलत भाऊ आहे. ते आठ दिवसांपासून बेपत्ता आहेत. प्रथमेश प्रमोद काळभोर (१५) आणि प्रतीक प्रमोद काळभोर (१४) अशी या दोन सख्ख्या भावांची नावे आहेत. आजीला न सांगताच ते घरातून निघून गेले. तसेच त्यांचा एक चूलत भाऊही बेपत्ता आहे.


अभ्याचा ताण 


आम्हाला अभ्याचा ताण सहन होत नाही. अभ्यासात यश नाही. त्यामुळे घर सोडून जात असल्याचे त्यांनी एका चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. आजीने दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.  दहिसर पोलीस या मुलांचा शोध घेत आहेत.


पोलिसांचे आवाहन


काशिमीरा येथे वडिलांसोबत राहणारा त्यांचा चुलतभाऊदेखील घरी परतला नाही. तो वडिलांकडून काही पैसे घेऊन बाहेर पडला आहे. हे तिघेही नेमके कुठे गेले आहेत हे सांगता येत नाही. मात्र त्यांचा शोध सुरू आहे.  कोणाला माहिती मिळाली तर आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत पिंगळे यांनी केलेय.


घरात चिठ्ठी सापडली


प्रथमेश आणि प्रतीक याच्या आई-वडिलांचे निधन झालेय. त्यामुळे हे दोघे आजीसोबत शांतीनगरमधील जनकल्याण इमारतीमध्ये राहतात. प्रथमेश दहावी तर प्रतीक नववीला आहे. घरी एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये आम्हाला अभ्यासात यश येत नसल्याने घर सोडून जात असल्याचे प्रथमेश आणि प्रतीक यांनी लिहिले आहे.