गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी. मुंबईच्या समुद्रात तीन तरुण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतल्या जुहू चौपाटीवरील तीन तरुण फिरण्यासाठी आले होते. चेंबूर वाशी नाका परिसरातील हे तीन तरुण असल्याची माहिती मिळतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुहूच्या समुद्रात पोहताना हे तीनही तरुण बुडाले. बुडालेल्या तरूणांपैकी दोघे जण सख्खे भाऊ आहेत. प्रथम गुप्ता आणि कौस्तुभ गुप्ता अशी या तरूणांची नावं आहेत. तिसऱ्याचं नाव अमन सिंग असं असून तो त्यांचा मित्र आहे. 


हे तिघेही जण 16 ते 21 वयोगटातले आहेत. नेव्ही, लाईफ गार्ड आणि अग्निशमन दलामार्फत या तिघांचा शोध घेतला जातोय.