MUKESH AMBANI AND FAMILY THRETENEND CALL : रिलायन्स उद्योग समुहामुळे जगभरातील श्रीमंतांच्या यादीत विराजमान होणाऱ्या अंबानी कुटुंबाला धोका असल्याची बाब समोर आली आहे. अंबानी कुटुंबाला पुढील तीन तासांत संपवण्याची धमकी देणारे काही फोन आल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक माहितीनुसार रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या लँडलाईनवर हे फोन आले. सात ते आठ फोन आले ज्या माध्यमातून धमकी देण्यात आली. मुंबई पोलिसांनी तातडीने प्रकरण हाती घेत तपास सुरु केला आहे. तेव्हा आता क्रमांकाची पडताळणी होताच कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष असेल. 


धमकी आल्यानंतर अंबानींचा राहत घर अंतोलिया पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे,एखाद्या राजमहालाप्रमाणे हे घर आहे  जगातील सर्वात महागड्या घरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे  
एंटीलिया मध्ये कुठल्याही गोष्टीची कमी नाहीय आलिशान घरात स्विमिंग पूल पासून ते गाडी सिनेमा थिएटर पर्यंत सर्व काही आहे 
तुम्ही बऱ्याचदा बाहेरून या घरचे फोटो पहिले असतीलच पण आतून हे घर कास दिसत चला पाहूया 


मुकेश अंबानी पत्नी नीता अंबानी सह दोन मूळ आणि सुनांसोबत या घरात राहतात मुंबईतील अल्टमाउंट रोड  वर बनवलेला  एंटीलिया २७ माजली आहे आणि जवळपास ४ लाख स्क्वेअर फुटावर पसरलेला आहे या गराची आताची किंमत आहे २०० करोड डॉलर  म्हणजे 11 हजार करोड रुपये.



मुकेश अंबानी यांच्या या घरात ९ लिफ्ट्स आहेत ,योग सेंटर, डांस स्टूडियो, हेल्थ स्पा आणि  स्विमिंग पूल सुद्धा आहेत 



एंंटीलियाच डिझाईन अशा प्रकारे करण्यात आलं आहे कि 8 रिश्टर स्केलचा भूकंप जरी आला तरी या घराला काही होऊ शकत नाही एंटीलिया हाउस 27 मजली जरी असलं तरी त्याची उंची 60 माजली वाटते कारण प्रत्येक फ्लोर ची उंची खूप वाढवण्यात आली आहे ..



अंबानींच्या घरातील प्रत्येक कार्यक्रम हा याच घरात साजरा होतो. कोणालाही हेवा वाटेल असं हे आहे मुकेश अंबानींचा  एंटीलिया.