AC Local ट्रेनच्या तिकिट दरांबाबत मोठी बातमी; रेल्वेमंत्र्यांचं सूचक व्यक्तव्य
Mumbai local train update : महामुंबईतील AC ट्रेनच्या तिकिट दरांबाबत प्रवाशांमध्ये नाराजी आहे. त्याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
मुंबई : महामुंबईतील चाकरमन्यांसाठी लोकल ट्रेन जीवनवाहिनी आहे. सध्या मध्य रेल्वेने कल्याण, टिटवाळा, ठाणे, बदलापूर ते मुंबईदरम्यान एसी लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. परंतू ट्रेनच्या तिकिट दरांबाबत प्रवाशांमध्ये नाराजी आहे. त्याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी एसी लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. परंतू या ट्रेनचे भाडे सर्वसाधारण प्रवाशांना परवडणारे नाही. त्यामुळे या ट्रेनला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर धावत असलेल्या एसी लोकल गाडीचे प्रवास भाडे कमी करण्यात येणार आहे.
प्रवाशांसाठी समाधान होईल असे नवे दर लावण्यात येतील..असं सूचक वक्तव्य रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलंय. याशिवाय ठाणे स्थानकाचा पुनर्विकासही केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.