मुंबईत लसीकरण केंद्र बंद होण्याच्या मार्गावर, दोन्ही लस घेतलेल्यांचे प्रमाण जाणून घ्या
अपुऱ्या पुरवठ्यामुळे मुंबईत लसीकरण केंद्रांना टाळे लावण्याची वेळ
मुंबई : मुंबईसह राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललीय. पण या तुलनेत कोरोना रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाहीयत. रेमडीसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय. दरम्यान अपुऱ्या पुरवठ्यामुळे मुंबईत लसीकरण केंद्रांना टाळे लावण्याची वेळ आलीय. विशेष म्हणजे
मुंबईत १ एप्रिलला सर्वाधिक लसीकरणाची नोंद झाले होते. आणि आता याला महिनाही उलटत नाही तोपर्यंत लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ आलीय.
सध्या 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. पण हे प्रमाणदेखील निम्म्यावरच आहे. यातही बहुतांश जणांनी पहिला डोसच घेतलाय. दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण साधारणपणे सात टक्के इतके आहे. ठाणे,पनवेल,नवी मुंबईत लस उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.
आम्ही लसीकरणासाठी पूर्णपणे सज्ज आहोत, केंद्राने वेळेत लसीकरण पुरवठा करावा अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आलीय. आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण असणार आहे. त्यामुळे राज्यांना वेळेत लस पोहोचणे गरजेचे आहे.
पालकमंत्र्यांचे निर्देश
1 मेपासून लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होतोय. या पार्श्वभुमीवर मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला महत्वाचे निर्देश दिलेत. मुंबई क्षेत्रातील सर्व 227 विभागात लसीकरण केंद्र कार्यान्वित करावीत असे आदीत्य ठाकरे यांनी म्हटलंय. वडाळ्यातल्या महानगरपालिका कुष्ठरोग रूग्णालयातलं लसीकरण केंद्राचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या केंद्रामुळे वडाळा पूर्व, पश्चिम आणि माटुंगा या परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे.