मुंबई : सरकारी कार्यालयात यापुढे ५० टक्के उपस्थिती ठेवली जाणार आहे. तसा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच रेल्वे, एसटी बस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालवण्याचा प्रयत्न असावा अशा सूचना सरकारच्यावतीने करण्यात आल्या आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसचा धोका कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी कार्यालयीन उपस्थिती कमी करण्याचा आणि गर्दी टाळण्यासाठी पावले उचलली आहेत.  यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामध्ये राज्यातील शासकीय कार्यालयात एक दिवसाआड पद्धतीने रोज ५० टक्के कर्मचारी येण्याचा सूचना केल्या आहेत.



 तसेच रेल्वे, एसटी बसेस, खासगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


मुंबईतील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा अंतराने सकाळी आणि दुपारी सुरु होतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.