मुंबई: आझाद मैदान इथे पान बिडी तंबाखू विक्रेत्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तंबाखूजन्य वस्तूंची विक्री आणि खाद्य पदार्थ एकत्र विकता येणार नाही असा कायदा करण्याच्या तयारीत सरकार आहे. त्याला विरोध करण्यात आला.


चॉकलेट्स, बिस्कीटं, वेफर्स, कोल्ड्रींक्स यांच्यासह सिगरेट, तंबाखूजन्य वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. मात्र यापुढे हे दृष्य न दिसण्याची शक्यता आहे. कारण पानपट्टी वर तंबाखूजन्य पदार्थ आणि इतर पदार्थ एकत्र विकता येणार नाहीत असा कायदा होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास 50 टक्के व्यवसाय धोक्यात येईल म्हणून विक्रेत्यांनी निदर्शनं केली. विक्रेत्यांचा विरोध असला तरी अनेकांनी याला पाठिंबा दिलाय. 


मुंबईसह महाराष्ट्रात 20 लाखाहून अधिक विडी तंबाखू विक्रेते आहेत. या व्यवसायामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. असं असलं तरी विद्यार्थ्यांमधली व्यसनाधिनता रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय. त्याच्या दृष्टीने सरकारने उचललेलं हे एक पाऊल आहे.