मुंबई : आज दिवसभरात राज्यात 9 हजार 181 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात 293 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढण्याचं प्रमाण सतत वाढतं आहे. परंतु यात एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाग्रस्त बरे होण्याचं प्रमाणही सतत वाढतं आहे. आज एका दिवसात राज्यात 6 हजार 711 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 24 हजार 513 इतकी झाली आहे. त्यापैकी एकूण 3 लाख 58 हजार 421 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 68.33 टक्के इतकं झालं आहे. सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 735 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 



राज्यात आतापर्यंत 18050 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.44 टक्के एवढा आहे. 


राज्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त एकट्या मुंबईत आहेत. मुंबईत आतापर्यंत 1,24,307 कोरोनाबाधित असून त्यापैकी 97,993 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मुंबईत 6845 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 19,172 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


सध्या राज्यात 10,01,268 जण होम क्वारंटाईनमध्ये असून 35,521 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.