मुंबई : सकाळच्या महत्त्वाच्या बातम्या, मुंबईत 12 डिसेंबरपासून रात्रीची जमावबंदी, राज्यात वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या, विदेशी दारू झाली स्वस्त, कोरोनाची लस घेतली नाही तर पगार नाही... वाचा सविस्तर, 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. मुस्लीम आरक्षण आणि वक्फ मालमत्तेचे रक्षण व्हावे यासाठी एमआयएमच्या वतीने आज तिरंगा रॅली काढण्यात येतेय. राज्यातील सर्व विभागातून तिरंगा रॅली मुंबईला निघाली आहे. औरंगाबाद शहरातून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली 32 गाड्यांची रॅली तिरंगा ध्वज लावून मुंबईकडे रवाना झालेत.


2. मुंबईत आजपासून 12 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आलीय...मोर्चा, रॅली, कोणत्याही आंदोलनाला परवानगी नाही असे नवे आदेश मुंबई पोलिसांनी जारी केलेयत...ओमायक्रॉनमुळे रॅली, मोर्चांवर बंदी आणल्याची माहिती पोलिसांनी दिलीय...मात्र, MIM च्या रॅलीमुळे जमावबंदी लागू केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...



3.राज्यात ओमायक्रॉनमुळे कोरोनाची लागण होणा-यांची संख्या वाढतेय. शुक्रवारी राज्यात 7 जणांना कोरोनाची नव्याने लागण झाल्याचं उघड झालंय, यात एका 3 वर्षीय चिमुकलीचाही समावेश आहे. या सात जणांपैकी 4 जणांनी दोन्ही डोस घेतले होते. तर एकाने एक डोस घेतला होता. 7 रूग्णांपैकी 3 रूग्ण मुंबईतील, तर 4 रूग्ण पिंपरी चिंचवड भागातील आहेत.


4. विदेशी दारू स्वस्त झाली आहे. परदेशातून आलेल्या मद्यावरील शुल्काचा दर राज्य सरकारने कमी केला आहे. 300 टक्क्यांवरून 150 टक्के हा दर करण्यात आला. दरम्यान, आठ प्रकारच्या दारूचे दर निश्चित करण्यात आले आहेत. 


5. कोरोना प्रतिबंध लस घेतलीत का? जर तुम्ही लस घेतली नसेल तर लवकरात लवकर घ्या...कारण तुम्ही लस न घेतलेल्या व्यक्तींना आता पगार मिळणार नाहीये. होय हे खरं आहे. गोंदियामध्ये आता लस घेतल्याशिवाय पगार मिळणार नाहीये.


6. येवला शहरासह तालुका कोरोनामुक्त झाला. आरोग्य विभाग,महसूल विभाग, पोलिस प्रशासन आणि नगरपालिका यांच्या अथक परिश्रमामुळे हे शक्य झालं आहे. येवला शहर तालुका कोरोनामुक्त झाला असून नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. असं असलं तरी नवीन व्हायरस भारतात दाखल झाला असून याबाबत अजूनही नागरिकांनी निष्काळजी न राहता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.