आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, वादळी ठरणार का?
हिवाळी अधिवेशन वादळी ठरतंय, आज या मुद्यांवरून खडाजंगी
सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : हिवाळी अधिवेशनांचा आज दुसरा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिला. आजच्या दुसऱ्या दिवसाकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिला आहे.आज शालेय आणि आरोग्य विभागात भरती परिक्षा घोटाळा यावर विरोधक विधीमंडळात आक्रमक होणार आहे.
राज्यातील शेतकरी वर्ग अतिवृष्टी विदर्भ कोकणात मराठवाडा मोठे नुकसान झाले. त्याची मदत अद्याप दिली गेली नाही याबाबत आज सत्ताधारी पक्षाला जाब विरोधक विचारणार आहे. विधीमंडळ परिसरांत सकाळी विरोधक आंदोलन करणार आहे.
विधानसभेत मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विषयी भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलेले विधान यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. कारवाई मागणी सेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी टाकली.
भाजपा आमदार अमित साटम यांनी कोव्हीड काळात नगर मिरा भाईंदर भंडारा येथे रूग्णालय आग लागून मृत्यू घटना घडल्या याची लक्षवेधी विशेष आहेत.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस आज सभागृहात भरती घोटाळा संदर्भात मोठा खुलासा करणार असल्याची माहिती समजते.
लोकलेखा समितीचा अहवाल ही आज मांडला जाणार. विधानसभा अध्यक्ष निवडणूक पद्धत आवाजी मतदानाने करण्याच्या संदर्भात सूचना हरकती नेमक्या दिल्या जाणार आहेत. आज याकडे लक्ष असून सादर केलेल्या पुरवण्या मागणी यावर ही आज चर्चा होइल. आज अनेक विधेयक सभागृहात मांडले जाणार आहेत.