मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक आज होणार आहे. हे पद शिवसेनेला दिले जाणार असून नीलम गोऱ्हे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. युतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात असल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. सभापती रामराजे निंबाळकर हे आज उपसभापती पदाच्या निवडणुकीची घोषणा करतील आणि कामकाज संपेपर्यंत या निवणुकीचे सोपस्कार पार पाडले जातील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वड्डेटीवार यांचे नाव लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेतील विरोधीपक्षनेते पद काँग्रेसला हवे असेल तर विधानपरिषदेतील उपसभापतीपदाची निवडणूक जाहीर करावी, अशी अट मुख्यमंत्री यांनी काँग्रेसला टाकल्याची चर्चा याआधीच सुरु होती.