मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांना यावर्षीही टोल भरावा लागणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इच्छुकांनी स्वतःचं नाव, गाडी नंबर, गावाचं नाव कागदावर लिहून द्यावं, ते जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा आरटीओ कार्यालयात द्यावं, कागदावर शिक्का मारून मिळेल त्यामुळे टोल भरावा लागणार नाही. 


टोलमाफी संदर्भात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक पार पडली. शासनाचे प्रतिनिधी, टोल प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. कोकणात रस्ते मार्गे जाणारे प्रवासी एक्स्प्रेस वे- पालीमार्गे आणि एक्स्प्रेस वे सातारामार्गे जातात. त्यांना टोलमाफी असणार आहे.