मुंबई : रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा दरम्यान स्लो ट्रॅकवर सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुलुंड ते माटुंगा दरम्यान सर्व अप धीम्या लोकल अप जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. तर हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवार असला तरी प्रत्येकाला सुट्टी नसते, त्यामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ होणार आहे. शिवाय रविवार असल्यामुळे फिरायला निघालेल्या प्रवाशांना देखील नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. 


उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे अति गरजेचं काम असल्यास बाहेर पडा. हा मेगाब्लॉक सकाळी ११.३० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे ऐन सुट्टीच्या दिवशी प्रवाशांची गैरसोय हेणार आहे.