चिंता वाढली : धारावीत कोरोनांच्या संख्येत सतत वाढ, मृतांचा एकूण आकडा ५३ वर
देशात कोरोना रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे.
मुंबई: धारावी, माहीम आणि दादरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होताना दिसून येत आहे. आज धारावीत नवीन ५३ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत दिवसागणिक कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच आहे. धारावीत एकूण कोरोना रूग्णांची संख्या ११९८ वर पोहचली असून एकूण मृत्यू संख्या ५३ आहे. त्याचप्रमाणे धारावी, माहीम आणि दादरमध्ये आज एकाही रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेलेला नाही.
'आज धारावी, माहीम आणि दादरमध्ये परंतु धारावीत ५३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकट्या धारावीत कोरोना रूग्णांची संख्या ११९८ वर पोहचली आहे. ' असं बीएमसीकडून सांगण्यात आलं आहे. आज या हॉटस्पॉट असलेल्या भागात एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही ही काही प्रमाणात दिलासा देणारी बाब आहे.
दादरमध्ये ४ रूग्ण वाढले असून येथील एकूण कोरोना रूग्णांची संख्या १५४ झाली आहे. तर माहिममध्ये ११ कोरोना रूग्णांची संख्या वाढली असून याठिकाणी एकूण कोरोना रूग्णसंख्या १८७ झाली आहे.
देशात कोरोना रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ३ हजार ९७० रुग्ण आढळले असून राज्यात १ हजार ५७६ रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या ८५ हजार ९४० वर पोहोचली आहे.