मराठी वर्षापासून राज्यात प्लास्टिकवर संपूर्ण बंदी
प्लास्टिक बंदीला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. टप्प्या टप्प्याने प्लास्टिक बंद होणार आहे.
मुंबई : राज्यात प्लास्टिकला संपूर्ण बंदी आणण्यात येणार आहे. प्लास्टिक बंदीला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. टप्प्या टप्प्याने प्लास्टिक बंद होणार आहे. तर सहा महिन्यानंतर पाण्याच्या बाटल्याही बंद होणार आहेत.
टप्प्या टप्प्याने बंदी
राज्यात प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. राज्यसरकारने दिली मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेय. काही टप्प्यात राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय अंमलात आणण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात पिशवी
पहिल्या टप्प्यात सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यावर बंदी घातली जाणार आहेत. गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरु होणार आहे.
पाण्याची बाटलीवर बंदी
सहा महिन्यांच्या कालावधीनंतर टप्प्याटप्प्याने दुसऱ्या टप्प्यात प्लास्टिक पाण्याची बाटलीवर बंदी घातली जाणार. नाशवंत - पुनरवापर पाण्याच्या बाटल्यांचावर भर दिला जाणार.