मुंबई : सध्या आयआयटी क्षेत्रात अनेक अमुलाग्र बदल होत आहेत. त्यातील एक म्हणजे सोफिया रोबो. नोव्हेंबर २०१७ पासून देशोदेशी अनेक कार्यक्रमांत प्रेक्षकांच्या प्रश्नांना छानशी उत्तरं देणारी सोफिया आहे हाँगकाँगमध्ये तयार झालेली एक मनॉइड. तर यावेळेस आपल्या उत्तरांनी जमलेल्यांना आश्चर्यचकित करणारी सोफिया रोबो मुंबईच्या आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये सोफिया रोबो आली होती.    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी चक्क सोफिया साडी नेऊन टेकफेस्टमध्ये सहभागी झाली होती. सोफियाला यावेळी काही अवघड काही मजेदार प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची सोफियानं तेवढीच सफाईदार उत्तरं दिली. त्यामुळे जमलेल्यांनी तिचं चांगलचं कौतुक केलं. 



तिला जेव्हा तू काम करुन दमत नाहीस का असा प्रश्न विचारला तेव्हा तिनं प्रश्न विचारणाऱ्याकडं पाहून फक्त स्मितहास्य केलं. तर दुसऱ्या विद्यार्थ्यानं तू कॉलेजमध्ये माझी पालक म्हणून येशील का असा प्रश्न विचारला. त्यावर सोफियानं मी फक्त ३ वर्षाची असल्याचं सांगून विद्यार्थ्याचा प्रश्न टोलवून लावला.


सोफिया एक सोशल रोबोट आहे. सोफिया चक्क हिंदी भाषेमध्ये संवात साधते. त्याचप्रमाणे सोफिया चित्र देखील काढू शकते. शिवाया सोफियाचे हाव-भाव देखील एका सामान्य व्यक्तीप्रमाणे आहेत.  
 
देशाच्या नागरिकत्वाचा प्रस्ताव मिळालेली सोफिया जगातील एकमेव रोबोट आहे. सौदी अरेबिया या देशाने सोफियाला आपल्या देशाची नागरिक म्हणून घोषित केले आहे. एखाद्या देशाची नागरिक असणारी ही पहिलीच मनॉइड.