मुंबई : ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे- बेलापूर मार्गावरील कळवा-विटावा रेल्वे ब्रीजखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. त्यामुळं त्याठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम सुरू असल्यानं वाहतूक विभागानं ऐरोलीमार्गे ईस्टर्न एकप्रेस हायवेहुन ठाण्याकडे वाहतूक वळवल्यानं ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीचा ताण पडला. याचा फटका सीएसटीहुन ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना देखील बसलाय. ईस्टर्न एकप्रेस हायवे मुलुंडपासून भांडुपपर्यत तसेच ऐरोली हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय.


नाताळमुळे आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जातेय.