मुंबई : होळीची सुट्टी आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुट्टीमुळे मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा बोर घाटात अमृतांजन पुलाच्या परिसरात पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक पहाटेपासून मंदावली असून थोड्याफार प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.


मात्र, ही कोंडी आता मोठ्या प्रमाणात कमी झाली असून लवकरच वाहतूक पूर्णतः खुली होईल, असे महामार्ग प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.