मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पुन्हा सुरु

पोलिसांकडून मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक बंद करण्यात आली होती.
मुंबई : संपूर्ण देशभरात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. रविवारी जनतेने घरी बसून जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला. मात्र आज सोमवारी अनेक जण रस्त्यांवर उतरले असल्याचं चित्र आहे. मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी पोलिसांकडून एक्स्प्रेस वेवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांची गर्दी झाल्याने पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.