मुंबई : शेतक-यांचा महामोर्चा आज ठाण्यातल्या आनंदनगर टोलनाका मार्गावरुन मुंबईत प्रवेश करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी मुंबईत वाहतुकीचा बोजवारा उडू नये यासाठी, मुंबई पोलिसांनी वाहतुकीचं नियोजन केलं आहे. वळवण्यात येणार आहे. मुंबईहून ठाण्याकडे जाणारी जड वाहतूक वाशी खाडी पूल, ऐरोली, विटावामार्गे वळवण्यात आली आहे.


तर पूर्व द्रुतगती मार्गावर हलक्या वाहनांसाठी दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू राहणार आहे. मात्र या मार्गावर वाहनांचा वेग ताशी 20 किलोमीटर ठेवणं चालकांसाठी बंधनकारक असेल. दरम्यान रविवार असल्यानं मुंबईतल्या वाहतुकीवर फारसा परिणाम जाणवणार नाही.


मात्र मध्य रेल्वेवर उद्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान मेगा ब्लॉक असल्यानं, मुंबईकरांनी घराबाहेर निघण्यापूर्वी प्रवासाचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे.